नाशिक - येवला तालुक्यात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण ग्रामीण भागातील सावरगाव येथील वयोवृद्ध व्यक्ती आहे. यामुळे, आता येवल्यातील कोरोनाबाधितांची संख्या 32 वर पोहोचली आहे. तर यातील 5 जण कोरोनामुक्त झाले असून मंगळवारी त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
येवल्यात आढळला आणखी एक कोरोनाचा रुग्ण, तालुक्यातील ग्रामीण भागात शिरकाव - कोरोनाचा नाशिकच्या ग्रामीण भागात शिरकाव
सोमवारी १० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील हा एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, इतर काही अहवाल येणे अद्याप बाकी आहे. हा रुग्ण ग्रामीण भागातील सावरगाव येथील वयोवृद्ध व्यक्ती आहे. यामुळे, आता येवल्यातील कोरोनाबाधितांची संख्या 32 वर पोहोचली आहे.
सोमवारी १० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील हा एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, इतर काही अहवाल येणे अद्याप बाकी आहे. यानंतर मंगळवारीही ५५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचे अहवाल काय येतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आता तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाने पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ येवलेकरांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.