नाशीक -गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेले तिघेजण बुडाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. प्रसंगावधान राखत जीवनरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दोघांना वाचवले तर एकाचा या घटनेत मृत्यू झाला.
गोदावरी नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश - Death
आज सकाळी साडेदहाच्या सुमारास सराफ बाजारात चांदी साफ करणारे कामगार गांधी तलावात आंघोळीसाठी आले होते. या दरम्यान तिघेही नदीपात्रात आंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही खोल पाण्यात बुडाले. यांच्यातील लक्ष्मण सवाराम मीना (वय १८) याचा बुडून मृत्यू झाला.
सराफ बाजारात चांदी साफ करणारे कामगार गांधी तलावात आंघोळीसाठीआज सकाळी साडेदहाच्या सुमारास आले होते. या दरम्यान तिघेही नदीपात्रात आंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाले. यांच्यातील लक्ष्मण सवाराम मीना (वय १८) याचा बुडून मृत्यू झाला. आजूबाजूला असलेल्या पर्यटकांनी आरडाओरडा करताच जीवनरक्षक दलाच्या कर्मचार्यांनी नदित ऊड्या घेऊन दोघांना वाचवले.
वैजापूरसाठी आवर्तन सोडल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या दरम्यान गोदावरी नदीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या युवकांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी स्थानिक जलतरणपटूंच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.