दिंडोरी (नाशिक) - तालुक्यातील देवळीचा पाडा येथील नागरिकांवर वनारे शिवारात बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात सदर नागरिक जखमी झाला. ऐन दुपारच्या सुमारास बिबट्याचा हल्ला झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामा -
दिंडोरी (नाशिक) - तालुक्यातील देवळीचा पाडा येथील नागरिकांवर वनारे शिवारात बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात सदर नागरिक जखमी झाला. ऐन दुपारच्या सुमारास बिबट्याचा हल्ला झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामा -
याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळीचा पाडा येथील दत्तू गंगाराम शेवरे (वय-६०) हे शेताला कुंपण करण्यासाठी वनारे शिवारातील जंगलात काटेरी वनस्पती आणण्यासाठी एक सहकाऱ्यासोबत दुपारी तीन ते चारच्या दरम्यान गेले होते. काटेरी वनस्पती तोडत असताना एका दाट झाडीतून अचानक बिबट्याने दत्तू शेवरे यांच्यावर हल्ला चढविला. पंजाने त्यांच्या कपाळावर, डोक्याच्या मागील बाजूस आणि उजव्या हातावर गंभीर दुखापत केली आहे. अचानक झालेल्या हल्ल्याने शेवरे प्रचंड घाबरून गेले पण त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्याने आरडाओरड करीत आजूबाजूचे नागरिक गोळा केले आणि बिबट्याला पळवून लावले. दरम्यान, जखमी झालेल्या दत्तू शेवरे यांना तातडीने ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
हेही वाचा -दुहेरी खूनाने पुणे हादरले, सासवड येथे आईचा तर कात्रज बोगद्याजवळ 8 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला
दरम्यान, सध्या पावसाचे दिवस असल्याने परिसरात शेतांचे मोकाट गुरांपासून संरक्षण करण्यासाठी काटेरी वनस्पतींचे कुंपण केले जाते. त्यासाठी काटेरी वनस्पती आणण्यासाठी शेतकरी आणि नागरिक जंगल परिसरात जात असतात. ऐन दुपारी बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.