महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शहरी जीवनशैलीमुळे आठपैकी एका महिलेला स्तनांच्या कर्करोगाचा धोका - avoid Breast Cancer

ऑक्टोबर महिना हा स्तन कर्करोग जनजागृती महिना म्हणून पळाला जातो. भारताच्या ग्रामीण भागातील 32 महिलांमागे एका महिलेला तर शहरी भागातील 8 महिलांमागे एका महिलेला स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका असल्याचे मत प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ राज नगरकर यांनी व्यक्त केले आहे. स्तनाचा कर्करोग होण्यामागची कारणांमध्ये शहरातील महिलांची जीवनशैली, उशिरा लग्न होणे, उशिरा माता होणे, बाळाला कमी वेळ स्तनपान करणे, अतिमानसिक ताण असणे, मद्यपान करणे यांचा समावेश आहे.

स्तनांच्या कर्करोगाचा धोका न्यूज
स्तनांच्या कर्करोगाचा धोका न्यूज

By

Published : Oct 2, 2020, 5:46 PM IST

नाशिक -धकाधकीच्या जीवनशैलीमुळे शहरातील आठपैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असून महिलांनी नियमित स्तनांची काळजी घेतल्यास कर्करोग होण्याचा धोका कमी होवू शकतो, असे मत कर्करोग तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

शहरी जीवनशैलीमुळे आठपैकी एका महिलेला स्तनांच्या कर्करोगाचा धोका
ऑक्टोबर महिना हा स्तन कर्करोग जनजागृती महिना म्हणून पळाला जातो. भारताच्या ग्रामीण भागातील 32 महिलांमागे एका महिलेला तर शहरी भागातील 8 महिलांमागे एका महिलेला स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका असल्याचे मत प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ राज नगरकर यांनी व्यक्त केले आहे. स्तनाचा कर्करोग होण्यामागची कारणांमध्ये शहरातील महिलांची जीवनशैली, उशिरा लग्न होणे, उशिरा माता होणे, बाळाला कमी वेळ स्तनपान करणे, अतिमानसिक ताण असणे, मद्यपान करणे यांचा समावेश आहे.

स्तनाचा कर्करोग होणे कसे टाळाल?

दिवसेंदिवस महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत असून याला महिलांची सध्याची जीवनशैली कारणीभूत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. सध्या महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. ह्या आजाराचे प्राथमिक लक्षणे ज्यात खोकला येणे, अशक्तपणा जाणवणे, अंग दुखणे, स्तनाग्रांमधून रक्तस्राव होणे, स्तनाला किंवा काखेत गाठ येणे हे आहेत. प्राथमिक अवस्थेत स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी महिलांनी स्तनांची स्वतः तपासणी शिकून घेणे गरजेचे असून चाळीशीनंतर महिलांनी वर्षातून एकदा मॅमोग्राफी करणे गरजेचे आहे. प्राथमिक अवस्थेत ह्या कर्करोगाचे निदान झाल्यास योग्य उपचारांनंतर तो पूर्ण बरा होतो, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

स्तन कर्करोग जनजागृतीसाठी महिला बाईक रॅलीचे आयोजन

बी फ्रेंड कर्करोग ह्या संकल्पने अंतर्गत कर्करोग रुग्ण आणि जे रुग्ण ह्या परिस्थितीमधून बरे झाले आहेत ते एकमेकांसोबत बोलून आपल्या समस्या आणि भीतीचे निराकरण करू शकणार आहेत. ह्या प्रकारचा हा भारतातील पहिला उपक्रम असणार असून स्तन कर्करोग जनजागृतीसाठी एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर वाव ग्रुपच्या वतीने पिंक थीम घेऊन 4 ऑक्टोबर रोजी महिला बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या कार्यक्रमाला कर्करोगावर मात केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details