नाशिक -दिंडोरी ते कसबे वणी रस्त्यावरील कृष्णगाव येथील वनविभाग परिसरालगत ट्रॅक्टर व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराला जबर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याच्या पाठीमागे बसलेली महिला जखमी झाली, तिला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचाराकरता नाशिकला रेफर करण्यात आले आहे. चिंतामन सावळीराम गायकवाड राहणर म्हैसखडक ता सुरगाणा असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून राधा वाघमारे असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
नाशिक : दिंडोरी तालुक्यात ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात; एक ठार, एक जखमी - accident news nashik rural
अपघातग्रस्त ट्रॅक्टर विटा भरून कसबे वणीकडून दिंडोरीकडे जात होता. दरम्यान, नाशिककडून येणाऱ्या मोटरसायकलला या ट्रॅक्टरची धडक बसली. या अपघातात विटांनी भरलेली ट्रॉली पलटी झाली तर, ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीचा चेंदामेंदा झाला असून दुचाकीस्वाराला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला.
पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर ट्रॅक्टर विटा भरून कसबे वणीकडून दिंडोरीकडे जात होता. दरम्यान, नाशिककडून येणाऱ्या मोटरसायकलला या ट्रॅक्टरची धडक बसली. या अपघातात विटांनी भरलेली ट्रॉली पलटी झाली तर, ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीचा चेंदामेंदा झाला असून दुचाकीस्वाराला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. त्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या राधा वाघमारे या जखमी झाल्या. त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर नाशिकला उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सदर ट्रॅक्टर हा वरखेडा येथील असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे वणी पोलीस ठाण्याचे हरिचंद्र चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलतांना सांगितले.
अपघात झाल्यानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. मात्र, क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत व पूर्ववत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तर, पुढील तपास कसबे वणी पोलीस ठाण्याचे एपीआय सागर शिंम्पी यांच्या मार्गदर्शनाखाली हरिश्चंद्र चव्हाण करत आहेत.
TAGGED:
accident news nashik rural