महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 14, 2019, 12:53 PM IST

Updated : Jun 14, 2019, 3:04 PM IST

ETV Bharat / state

नाशकात मुथ्थुट फायनान्स कार्यालय लुटण्याचा प्रयत्न; दरोडेखोरांच्या गोळीबारात एक ठार, ३ जखमी

घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोरांचा मागोवा घेऊन तपासाला गती दिली जाईल, अशी माहिती आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

जखमीला उपचारासाठी नेताना

नाशिक - शहरातील सिटी सेंटर मॉल जवळील मुथ्थुट फायनान्सच्या कार्यालयावर अज्ञात लुटारूंनी गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत एक कर्मचारी ठार झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत.

नाशकात मुथ्थुट फायनान्समध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू, ३ जण जखमी

मुथ्थुट फायनान्स कंपनीचे सिटी सेंटर मॉल जवळ कार्यालयात सकाळी साडेअकराच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी तोंडावर काळा कपडा बांधून प्रवेश केला. मुथ्थुट फायनान्समध्ये असलेल्या कर्मचारी आणि ग्राहकांचे मोबाईल जमा करून घेतले. यावेळी वाद घालत अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीतुन ५ राउंड फायर केल्याचे सांगितले जाते. फायनान्स कंपनीतील संगणक अभियंता असणाऱ्या संजू सैमुयुल (वय. 32 राहणार केरळ) यांना ३ गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मॅनेजर चंद्रशेखर देशपांडे, कैलास जैन हे कर्मचारी जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये फायनान्स मॅनेजर आणि सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोरांचा मागोवा घेऊन तपासाला गती दिली जाईल, अशी माहिती आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

Last Updated : Jun 14, 2019, 3:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details