नाशिक- वऱहाडाचा टेम्पो पलटी झाल्याने यात एकाचा मृत्यू झाला असून 45 जण जखमी झाले आहेत. नांदगाव वेहेळगाव रस्त्यावरील जामदरी फाट्याजवळ हातगाव चाळीसगाव येथील वऱ्हाड नाशिक येथे लग्नावरून परतताना हा अपघात झाला. यात सनी भाऊसाहेब आव्हाड या दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. जखमींवर नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत,
नाशकातील नांदगाव-वेहेळगाव रस्त्यावर वऱ्हाडाचा टेम्पो उलटला; एक ठार, 45 जखमी - टेम्पो उलटला
हातगाव येथील विलास आव्हाड यांच्या मुलीचे लग्न नाशिकच्या उपनगर येथील इच्छामणी लॉन्स येथे होते. लग्न आटोपल्यानंतर वऱ्हाडी घराकडे परतत असताना नांदगाव वेहेळगाव रस्त्यावरील जामदरी फाट्याजवळ चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्यावर पलटी झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हातगाव येथील विलास आव्हाड यांच्या मुलीचे लग्न नाशिकच्या उपनगर येथील इच्छामणी लॉन्स येथे होते. लग्न आटोपल्यानंतर वऱ्हाडी घराकडे परतत असताना नांदगाव वेहेळगाव रस्त्यावरील जामदरी फाट्याजवळ चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून वर्हाडातील 40 ते 45 जण जखमी झाले, आहेत. घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेद्वारे जखमींना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात चंद्रकला आव्हाड, विजय आव्हाड,दत्तू आव्हाड, गाया आव्हाड, संजय आव्हाड, संगीता पाटील, राजाराम आव्हाड, लक्ष्मी आव्हाड, शांताबाई सांगळे, यमुनाबाई राठोड, रमेश आव्हाड, काजल आव्हाड यांच्यासह इतर जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी करत असून, नांदगाव पोलीस ठाण्यात याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.