नाशिक:कडाक्याच्या थंडीत जन्मदात्यांच्या भावना गोठल्याचे चित्र नाशिकच्या चुंचाळे भागात बघायला मिळालं. एक दिवसाची बालिका नकोशी झालेल्या क्रूर जन्मदात्यांनी जन्माला घेऊन काही तासच झालेल्या पोटच्याची मुलीला पिशवीत कोंबून तिला रस्त्यावर कडेला कचऱ्यासारखे फेकून दिले. थंडीत कुडकुडत टाहो फोडत असताना देखील माता- पित्यांना भावनेचा पाझर फुटला नाही. तिला बेवारस टाकत निगदपणे निघून गेले. काही वेळातच या चिमुकलीचे कुत्र्याने अक्षरशः लचके तोडले. अतिरक्तस्राव होऊन उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला आहे.
संशयित माता पिता विरोधात गुन्हा दाखल:काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने समाज मन सुन्न झाले आहे. हे घटना परिसरातील मुलांच्या सकाळी लक्षात आल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले आहे. पंचनामा करताना पोलिसांचे डोळे भरून आले आहे. अंबड पोलीस ठाण्यात संशयित माता पिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित महिला व एक व्यक्ती पिशवीत अर्भक घेऊन जाताना सीसीटीव्हीत कैद झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.