दिंडोरी (नाशिक)-दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील एका ६८ वर्षीय रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्यामुळे निळवंडी गावाचा परिसर सील करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या 3 वर पोहोचली आहे.
दिंडोरी तालुक्यात आणखी एक कोरोना रुग्ण; तालुक्यातील रुग्णसंख्या 3 वर - Dindori corona news
निळवंडी येथील एका ६८ वर्षीय रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या 3 वर पोहोचली आहे. तालुक्यातील लोकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी केले आहे.
निळवंडी येथील ६८वर्षीय पुरुष हा दिंडोरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्यानंतर हा व्यक्ती दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेला असता, त्याला नाशिक येथे जाण्यास सांगण्यात आले करण्यात आले. नाशिक येथे व्यक्तीची कोरोना तपासणी करण्यात आली. हा व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे. प्रशासनाने या अहवालाची तत्काळ दखल घेत रुग्ण राहत असलेला परिसर कंटेनमेंट झोन म्हणून व त्या लगतचा परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे. सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले असल्याचे डॉ. सुजित कोशिरे यांनी सांगितले.
या रुग्णाचे भाजीपाला आणण्यासाठी नाशिक येथे येणे जाणे होते. म्हणून तेथेच तो कोणाच्या तरी संर्पकात आला असावा, असा अंदाज आहे. रुग्णाच्या संपर्कातील लोकांना कोविड उपचार केंद्र येथे पाठविण्यात आले आहे. तालुक्यातील लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन दिंडोरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी केले आहे.