नाशिक - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा सर्वांनी धसका घेतला आहे. याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या बाजारपेठेवर होताना दिसत आहे. मोबाईल, टीव्ही, एलईडी, एसी यांसारख्या वस्तू आणि त्यांचे स्पेयर पार्ट यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तसेच बाजारात देखील या वस्तु उपलब्ध होत नसल्याने त्याचा व्यापारावर परिणाम होत आहे.
कोरोना व्हायरसचा बाजारपेठेवर परिणाम... इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या किमतीत वाढ हेही वाचा...कोरोनाचे गुजरातमध्ये दोन, तर हिमाचलमध्ये तीन संशयित आढळले..
चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा आता संपुर्ण जगाने धसका घेतला आहे. अनेक देशांनी चीन आणि कोरोना बाधित असलेल्या देशांतर्गत हवाई सेवा व व्यापार बंद केले आहेत. याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेवर होत आहे. त्यामुळे मोबाईलसह टीव्ही, एलईडी, टीव्ही, एसी यांच्या किंमतीत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच या वस्तु विक्रीसाठी उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे, असे व्यापारी वर्गातून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा...कोरोना विषाणूमुळे जनतेने घाबरून जाऊ नये - राजेश टोपे
'पूर्वी जे व्यापारी स्वतः फोन करून काय माल पाठवू ? असे विचारत होते. ते आता पूर्णपणे पैसे जमा केल्याशिवाय माल पाठवत नाही' असे बोलत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. दरम्यान कोरोना व्हायरस बरोबर लढा देण्यासाठी देशभर आरोग्य यंत्रणा सज्ज झालेली आहे. तरीही कोरोनाचा मोठा फटका इलेक्ट्रॉनिक वस्तुसह चीनवरून येणाऱ्या वस्तुंच्या बाजाराला बसला आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तुंच्या किंमतीमध्ये वाढ झालेली दिसत आहे. तर अनेक वस्तू उपलब्धच होत नसल्याने ग्राहकांचा हिरमोड होत आहे. तसेच सध्या ज्या व्यापाऱ्यांकडे माल शिल्लक आहेत. ते पूर्ण पैसे अगोदर घेऊन देखील माल उपलब्ध करत नसल्याने, व्यापारावर परिणाम होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.