महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्र सरकारविरोधात 'एनआरएमयू'चे मनमाड स्थानकात धरणे आंदोलन - manmad NRMU news

रेल्वेच्या खासगीकरणाविरोधात केंद्र सरकारचे निषेध करत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे कामगारांनी मनमाड रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन केले.

agitator
agitator

By

Published : Aug 9, 2020, 5:08 PM IST

मनमाड (नाशिक) - रेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात रेल्वे संघटना रस्त्यावर उतरल्या असून आज (दि. 9 ऑगस्ट) क्रांती दिनानिमित्त नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे कामगारांनी मनमाड रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन करत तीव्र निदर्शने केले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्र सरकार रेल्वेचे खासगीकरण करण्याचा घाट घालत असल्याचा आरोप करत क्रांती दिन तसेच संघर्ष दिनाचे औचित्य साधून नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाने रेल्वेचे खासगीकरण करू नये, अन्यथा रेल कामगार संघटना चक्का जाम आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी कॉ. अंबादास निकम, शबरीश नायर, हेमंत डोंगरे, रमेश केदारे, सचिन काकड, संदीप सोनवणे, भाऊराज आंधळे, सुनील गडवे, शांताराम गरुड, चेतन आहिरे, आंनद भारस्कर, मिलिंद लिहिणार, नंदा चौधरी, कुसुम पोहाल, सरला केदारे, कमल पवार यांच्यासह कामगार आणि महिला कामगार आंदोलनात सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details