महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वे डब्यात असणार आता महिला पोलिसांची गस्त - ladies security news in train

पुरुष पोलिसांसह आता रेल्वे डब्यात महिला पोलिसांची गस्त राहणार आहे. दिवाळीच्या सुट्टीमध्ये प्रवाशांची वाढलेली गर्दी व महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नाशिक रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त सुरू केली आहे.

महिला पोलीस

By

Published : Nov 1, 2019, 3:53 PM IST

नाशिक- पुरूष पोलिसांसह आता रेल्वे डब्यात महिला पोलिसांची गस्त राहणार आहे. दिवाळीच्या सुट्टीमध्ये प्रवाशांची वाढलेली गर्दी व महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नाशिक रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त सुरू केली आहे. यामुळे रेल्वेत होणाऱ्या चोऱ्यांवर आळा बसेल, असा विश्वास रेल्वे सुरक्षा दलाला वाटतो.

हेही वाचा -'भाजपला सरकार स्थापन करता आले नाही तर, पर्यायी सरकार स्थापन करू'

दिल्लीला आठवड्यातून तीनदा जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये नाशिक येथून दोन महिला पोलीस व एक जवान जळगावपर्यंत रेल्वेमध्ये गस्त घालत आहेत. जळगावहून पुन्हा महिला व पुरूष पोलीस कर्मचारी गस्त घालत नाशिक रोडला येतात. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या पद्धतीची गस्त कायम ठेवून गस्तीच्या पोलीस कर्मचाऱ्यांना शस्त्र देखील देण्यात येणार असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत यांनी सांगितले.

नाशिक रोड आरपीएफची हद्द घोटीपासून कसबे सुकानेपर्यंत असली तरी जळगावपर्यंत रेल्वेगाडीत गस्त घातली जात आहे. यापूर्वी रेल्वेत पुरूष कर्मचारी गस्त घालण्याचे काम करत होते. आता महिला कर्मचारी देखील नियुक्त केल्यामुळे रेल्वे स्थानक व रेल्वेत होणाऱ्या चोऱ्यांना काही प्रमाणात आळा बसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details