महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Happy New Year : नो विस्की नो बिअर हॅपी न्यू ईअर हॅपी न्यू ईअर; अंनिसने मद्याला विरोध करत केले मोफत दुध वाटप - Nashik against alcohol

सरत्या वर्षांला निरोप देतांना व नववर्षाचे स्वागत ( Welcome to New Year ) करतांना मद्याच्या आहारी जाऊ ( Annis opposition to alcohol ) नये,असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले. या निमित्ताने हुतात्मा स्मारक समोर 'द दारूचा नव्हे तर द दुधाचा' प्रबोधन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अंनिस
अंनिस

By

Published : Dec 31, 2022, 10:30 PM IST

नो विस्की नो बिअर हॅपी न्यू ईअर हॅपी न्यू ईअर

नाशिक - नो विस्की नो बिअर हॅपी न्यू ईअर हॅपी न्यू ईअर'( No Whiskey No Beer Happy New Year Happy New Year ) मद्याचे ( Annis opposition to alcohol ) दुष्परिणाम पटवून देत मोफत मसाला दुधाचे वाटप अंनिसने केले. यावेळी 'चला व्यसनाला बदनाम करू या ' नो विस्की नो बिअर हॅपी न्यू ईअर हॅपी न्यू ईअर' अशा घोषणा देण्यात आल्या. नववर्षाचे स्वागत फटाके फोडून, प्रदुषणाने करू नका ( Dont welcome the New Year by bursting firecrackers ) असे अवाहन देखील करण्यात आले.

अंनिस

नववर्ष धुंदीत नव्हे तर शुद्धीत साजरे करा -या अनोख्या प्रबोधन कार्यक्रमाचे लोकांना कौतुक वाटले. या वेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डाॅ.टी.आर.गोराणे, कृष्णा चांदगुडे, राजेंद्र फेगडे, प्रल्हाद मिस्त्री, ॲड समीर शिंदे, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे, विजय खंडेराव, दिपक वर्दे, नितीन बागुल आदीसह कार्यकर्त उपस्थित होते.

"द म्हणजे दारूचा नव्हे तर द म्हणजे दुधाचा" - नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईकडून मोठ्या प्रमाणावर मद्यपान केले जाते. मात्र अंनिस कडून मद्याला विरोध करून मोफत दुधाचे वाटप करण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या हुतात्मा स्मारक इथं हा अभिनव घेण्यात आला आहे."द म्हणजे दारूचा नव्हे तर द म्हणजे दुधाचा"हा व्यसनमुक्तीचा संदेश महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details