नाशिक - पाणीदार तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवन तालुक्यावर सध्या पाणीटंचाईचे संकट घोंगावात आहे. जून महिना संपत आला असताना सुद्धा पावसाने अजूनही हजेरी न लावल्याने तालुक्यातील धरणांनी तळ गाठला आहे.
पाणीदार तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवनवर पाणीटंचाईचे संकट; तालुक्यातील धरणांनी तळ गाठला - जळगाव
पाणीदार तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवन तालुक्यावर सध्या पाणीटंचाईचे संकट घोंगावात आहे. जून महिना संपत आला असताना सुद्धा पावसाने अजूनही हजेरी न लावल्याने तालुक्यातील धरणांनी तळ गाठला आहे.
कोरड्याठाक झालेल्या पाझर तलाव आणि धरणांमुळे पाणी संकट अधिकच गडद झाले असून सर्व लोकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तालुक्यातील चणकापूर आणि पुनद, ही दोन मोठी धरणे कसमादे पटट्याची तहान भागवत असतात. मात्र काही वर्षात घटते पर्जन्यमान आणि पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे धरणाचे पाणी उन्हाळ्याच्या अखेरीस संपते. मात्र, यावर्षी तर कसमादेसह जळगावलाही पाणी पाजणाऱ्या चणकापूर धरणासह तालुक्यातील अनेक लघु पाटबंधारे प्रकल्पांनी तळ गाठला आहे. या पटट्यात पाऊस झाला नसल्याने धरणे कोरडी झाली आहेत.
चणकापूर धरण कोरडेठाक झाले आहे. तर पुनंद धरणात अवघे १०८ घनफूटच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पावसाने उशीर केल्यास आणीबाणीची परिस्थिती कसमादेसह मालेगाव, जळगाव या जिल्ह्यांना निर्माण होण्याची चिन्हे आहेत.