महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची बातमी खोटी, जिल्हा आरोग्य विभागाचा खुलासा

नाशिकमध्ये ६ रुग्ण कोरोनाबाधित आढळल्याची अफवा पसरली होती. मात्र आरोग्य विभागाने यास नकार दिला असून, जिल्ह्यात सद्यस्थितीत एकच रुग्ण असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, ९ संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित असून ते शुक्रवारी रात्रीपर्यंत मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिकमध्ये सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळ्याची बातमी खोटी
नाशिकमध्ये सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळ्याची बातमी खोटी

By

Published : Apr 3, 2020, 2:38 PM IST

Updated : Apr 3, 2020, 4:01 PM IST

नाशिक - नाशिकमध्ये ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची अफवा पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, शहर व जिल्ह्यात नव्याने एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नसल्याची माहिती निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी दिली आहे.

नाशिकमध्ये सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची बातमी खोटी

नाशिकमध्ये ६ रुग्ण कोरोनाबाधित आढळल्याची अफवा पसरली होती. मात्र, आरोग्य विभागाने यास नकार दिला असून, जिल्ह्यात सद्यस्थितीत एकच रुग्ण असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, ९ संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित असून ते आज(शुक्रवार) रात्री मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे नाशिककरांनी ६ पॉझिटिव्ह रुग्ण असल्याच्या बातमीने घाबरण्याचे कोणतही कारण नाही मात्र, काळजी घेणं गरजेच आहे. दरम्यान, या बातमीनंतर नाशिक शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, नाशिक जिल्हा प्राशसनाने याबाबत खुलासा करून ६ पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची बातमी केवळ आणि केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

Last Updated : Apr 3, 2020, 4:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details