महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 30, 2020, 1:46 PM IST

ETV Bharat / state

त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पालखी शिवशाहीने रवाना

दरवर्षी ज्येष्ठ शुध्द पौर्णिमेस निवृत्तीनाथांची पालखी पंढरपुरला प्रस्थान करते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्चभूमीवर पायी पालखी नेण्यास परवानगी नसल्याने मंदिरातच मंगळवारी मोजक्या विश्वस्त व मानकऱ्यांच्या उपस्थितीत प्रथम परंपरेचे अभंग म्हणण्यात आले. पालखीची पूजा करून या पालखीत निवृत्तीनाथांची प्रतिमा व पादुका ठेवण्यात आल्या.

aashadhi-wari
त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पालखी शिवशाहीने रवाना

नाशिक - सव्वाशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेली संत निवृत्तीनाथ महाराजांची आषाढी वारी इतिहासात प्रथमच राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसने पंढरपूरला रवाना झाली. या वारीत फक्त १४ वारकऱ्यांसह विश्वस्त सहभागी झाले आहेत.

दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेस निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरला प्रस्थान करते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्चभूमीवर पायी पालखी नेण्यास परवानगी नसल्याने मंदिरातच मंगळवारी मोजक्या विश्वस्त व मानकऱ्यांच्या उपस्थितीत प्रथम परंपरेचे अभंग म्हणण्यात आले. पालखीची पूजा करून या पालखीत निवृत्तीनाथांची प्रतिमा व पादुका ठेवण्यात आल्या. त्यानंतर नाथांच्या जयघोषात पालखी मंदिर प्रांगणात प्रदक्षिणा करण्यात आली. त्यानंतर जव्हार फाटा येथून पालखीस निरोप देण्यात आला. यावेळी आमदार हिरामण खोसकर, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, पोलीस उपविभागीय अधिकारी भिमाशंकर ढोले, तहसीलदार दिपक गिरासे, पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे उपस्थित होते.

सकाळी आठ वाजता संत निवृत्तीनाथ मंदिरात पूजा करण्यात आली. त्यानंतर परंपरेनुसार नाथांच्या पादुका व प्रतिमा कुशावर्तावर स्नानासाठी नेण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकरांनी सपत्निक पादुकेस स्नान घातले. कुशावर्तावर वारीच्या प्रस्थानाचे अभंग व आरती करण्यात आली. त्यानंतर ञ्यंबकेश्वरांच्या मंदिराच्या महाद्वाराचे दर्शन घेऊन पंढरपूरसाठी वारीचे प्रस्थान झाले.

ञ्यंबकेश्वर ते पंढरपूर दरम्यान शिवशाही बसने निघणाऱ्या वारीचे ऐतिहासिक परंपरा खंडीत झाली आहे. दिंडीप्रमुख नसल्याने शेकडो वर्षांची परंपरा कोरोनामुळे मोडीत निघाल्याने वारकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. दरवर्षी आषाढी पौणिमेला पायी निघणाऱ्या निवृत्ती नाथांची वारी कोरोनामुळे शिवशाहीने जात असल्याने सर्व सामान्य वारकरी पालखीच्या दर्शनापासून वंचित राहिले.

त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पालखी शिवशाहीने रवाना

ABOUT THE AUTHOR

...view details