नाशिक- शहरात महिला दिनाच्या निमित्ताने 'निर्भया मॅरेथान'चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला भारतीय संघाचा मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणे, बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर, सैराट गर्ल रिंकू राजगुरू, मराठी अभिनेता जितेंद्र जोशी यांच्यासह नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांनी हजेरी लावली होती.
निर्भया मॅरेथानमध्ये महाराष्ट्रभरातील १८ हजाराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यात जवळपास ६ हजार महिलांचा सहभाग होता. आज पहाटे ५.३० मिनिटांनी अजिंक्य रहाणे आणि नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी २१ किलोमीटर आणि १० किलोमीटरच्या मॅरेथान स्पर्धेला झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात केली. ५ आणि ३ किलोमीटरच्या स्पर्धेची सुरुवात जान्हवी कपूर आणि रिंकू राजगुरु यांच्या हस्ते करण्यात आले.