महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात तब्बल 90 लाखांचे कोकेन जप्त, तिघांना अटक - selling koken nashik

अमली पदार्थ विक्रीच्या आरोपातून पोलिसांनी मनोज कुमार जयप्रकाश यादव (राहणार फिरोझाबाद, उत्तर प्रदेश) साहेबाजान साबीद अली शेख (रा. सातपूर, नाशिक) नितीन सोपान खोडके (रा. नाशिक रोड ) यांना अटक केले आहे.

koken nashik
नाशकात तब्बल 90 लाखांचे कोकेन जप्त, तिघांना अटक

By

Published : Mar 7, 2020, 6:07 PM IST

Updated : Mar 7, 2020, 7:12 PM IST

नाशिक - सिन्नर फाटा भागातील रेल्वे गेटजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांकडून 90 लाख रुपयांचे कोकेन जप्त केल असून त्यांना अटक केली आहे. आरोपींवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज कुमार जयप्रकाश यादव (राहणार फिरोझाबाद, उत्तर प्रदेश) साहेबाजान साबीद अली शेख (रा. सातपूर, नाशिक) नितीन सोपान खोडके (रा. नाशिक रोड ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा -ठाकरे सरकारच्या १०० दिवसातील नेत्यांची 'तू-तू मैं-मैं'

शुक्रवारी (6 मार्च) रात्रीच्या सुमारास पोलिसांनी नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या बंद प्रवेशद्वाराजवळ तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 896 ग्रॅम वजनाचे 90 लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले. त्यांच्या विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायदा 1985, 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. कारवाईनंतर नाशिकमध्ये कोकेन विक्रीचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा -कुंपणच खातंय शेत, पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानाच्या गावाला भ्रष्टाचाराची किड...

Last Updated : Mar 7, 2020, 7:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details