महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याआधीच सरकारने आरेतील झाडांची कत्तल केली - नीलम गोऱ्हे

आरे कॉलनीतील लढा अनेक वर्षांपासून सुरू आहे, आधीच महाराष्ट्र्रात झाडे नष्ट होत असल्याने हवामानात बदल होत आहे. त्यामुळे महापुरासारख्या आपत्तीच्या घटना समोर येत आहेत. तसेच वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याचे शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

निलम गोऱ्हे

By

Published : Oct 5, 2019, 9:23 PM IST

नाशिक- सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याआधीच सरकारने आरे येथील झाडांची रात्रीतून कत्तल केल्याचा आरोप शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी केला आहे. नाशिकमध्ये त्या बोलत होत्या.

हेही वाचा - 'आरे कारशेड' प्रकरणी सेना बॅकफूटवर; उद्धव ठाकरे म्हणतात...

आरे कॉलनीतील लढा अनेक वर्षांपासून सुरू आहे, आधीच महाराष्ट्र्रात झाडे नष्ट होत असल्याने हवामानात बदल होत आहे. त्यामुळे महापुरासारख्या आपत्तीच्या घटना समोर येत आहेत. तसेच वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याचे शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचा नामांकन अर्ज वैध, आशिष देशमुखांची मागणी फेटाळली

झाडे तोडण्याबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यावर तो वेबसाईटवर टाकणे गरजेचे असताना सरकारने एका रात्रीतून झाडे तोडून टाकले, हे चुकीचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलन करत असून आदित्य ठाकरे यांनी तर हा पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला असल्याचे म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details