नाशिक - कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पंधरा हजारांच्या घरात गेली आहे. जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली असून कोरोना विषयक सुरक्षा नियमांची जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. त्याचबरोबर नाशिककरांनी स्वयंशिस्त पाळावी अशी साद त्यांनी घातली आहे.
नाशिक : कोरोना जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे - जिल्हाधिकारी
कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पंधरा हजारांच्या घरात गेली आहे. जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली असून कोरोना विषयक सुरक्षा नियमांची जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
..त्यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार -
जिल्हाधिकारी मांढरे यांनी रविवारी व्हिडिओद्वारे जनतेशी संवाद साधत वाढत्या कोरोना संकटाबाबत नागरिकांना जागृत करत संकट किती भयाणक आहे याची माहिती दिली. मागील वर्षी कोरोना संकट आल्यावर पंधरा हजार रुग्ण संख्या पार करायला दोन ते तीन महिने लागले. मात्र, आता दोन तीन आठवडयातच रुग्णांचा आकडा इतका झाला असून प्रशासनासमोर तीन आव्हाने आहेत. सर्वात पहिले आरोग्य यंत्रणेचा सेटअप उभे करणे. दुसरे नागरिक आता कोरोनाला घाबरत नाहीत. कोरोना लागण झालेले रुग्ण घरीच उपचार घेउन माहिती लपवतात. त्यामुळे करोना स्प्रेड होत आहे. तर तिसरे आव्हान म्हणजे कारवाईने नियंत्रण मिळवायचे की प्रबोधन करुन.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'मी जबाबदार' भिंतीचित्र पत्रकाचे अनावरण -
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत आपण 'मी जबाबदार' भिंतीचित्र पत्रकाचे अनावरण केले. कोरोनाबाबत जनजागृती करणे आवश्यक असून आता स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, अशी साद त्यांनी घातली. तसेच नागरिकांनी सुरक्षा नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सद्यस्थितीत १७ हजार ६०२ रुग्णांवर उपचार सुरू -
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख २९ हजार २ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १७ हजार ६०२ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार २२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.