महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कळवणमध्ये दहा जणांचे रिपोर्ट कोरोनाचे पॉझिटिव्ह, शहरात शुक्रवारपासून सात दिवस जनता कर्फ्यू - नाशिक कोरोना आकडेवारी

शनिवारी शहरातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण करत संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आठ व इतर दोन अशा दहा रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. त्यामुळे कळवण शहरातील रुग्णसंख्या अकरावर पोहोचली असून खबरदारी म्हणून उद्यापासून पुढील सात दिवस शहरात जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.

कळवण शहरात दहा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
कळवण शहरात दहा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

By

Published : Jul 16, 2020, 3:08 PM IST

नाशिक -जिल्ह्याच्या कळवण शहरातील करोना रुग्ण संख्येत वाढ झाली असून आज(गुरुवार) तब्बल दहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत रुग्ण संख्या नियंत्रणात असलेल्या कळवण शहरामध्ये रुग्ण वाढल्याने उद्यापासून पुढील सात दिवस कळवण शहरात जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.

आत्तापर्यंत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असलेल्या कळवण शहरात आज दहा रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कळवणकरांच्या चिंतेत भर पडली आहे. शनिवारी शहरातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण करत संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आठ व इतर दोन अशा दहा रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी दिली. त्यामुळे कळवण शहरातील रुग्णसंख्या अकरावर पोहोचली आहे.

दरम्यान, आज सकाळी कळवणचे तहसीलदार बंडू कापसे यांनी प्रतिबंधित क्षेत्रात पाहणी करून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना नगरपंचायत व पोलीस प्रशासनाला केल्या आहेत. कळवण शहरातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे आज सकाळी कळवण शहर व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत उद्यापासून पुढील गुरुवारपर्यंत कळवण शहरात मेडिकल सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने जाहीर केला. या कालावधीत दुकाने उघडी दिसल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कळवण शहरात आरोग्य विभागातर्फे सर्व्हेक्षण सुरू असून नागरिकांनी विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details