नाशिक -जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. 25 जुलैमागील 24 तासात 611 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून ह्यात 540 रुग्ण नाशिक शहरातील आहेत. ह्यात 15 जणांचा मृत्यू झाला असून ह्यातील 11 रुग्ण हे शहरातील आहेत. तर, 454 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 11 हजार 943 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून ह्यात 7 हजार 558 रुगण नाशिक शहरातील तर, 2 हजार 988 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ह्यात आतापर्यंत 454 जणांचा मृत्या झाला असून 8 हजार 601 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, नाशिक शहरातही कोरोनाबधित रुग्णांचा आकडा वाढत असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. आतापर्यंत 5 हजार 443 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 245 जणांचा बळी गेला आहे.
नागरिकांचा हलगर्जीपणा नडला -
लॉकडाऊननंतर नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 20 मे रोजी फक्त 48 कोरोनाबाधित रुग्ण शहारत होते. मात्र, लॉकडाऊन संपल्यावर शहरात सरासरी 125 ते 130 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रोज मिळून येत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिक शहरात रोज 250 ते 300 रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नाशिकच्या नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे.
मृतांची संख्या
- नाशिक ग्रामीण 106
- नाशिक मनपा 245
- मालेगाव मनपा 84
- जिल्हा बाह्य 19
- एकूण नाशिक जिल्ह्यात 454
नाशिक जिल्ह्याची आतापर्यंतची परिस्थिती - नाशिक जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्ण 11611
- कोरोनामुक्त - 8601
- एकूण मृत्यू -454
- एकूण उपचार घेत असलेले रुग्ण-5472
- नवीन संशयित दाखल- 1195