महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी देवस्थानाकडून नियमावली जाहीर.. 65 वर्षांवरील वृद्ध व लहान मुलांना प्रवेश बंद - सप्तशृंगी देवस्थान ट्रस्ट

राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता उद्रेक आणि नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता सप्तशृंगी देवस्थान (Saptashrungi temple nasik ) ट्रस्टच्या वतीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे. लसीकरणाचा एकही डोस नसेल तर सप्तशृंगी देवी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही तसेच १० वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या लहानग्यांना तसेच ६५ वर्षे वरील वृद्धांना मंदिरात प्रवेश नसणार आहे. ई-पास आणि ऑनलाईन दर्शन सुविधा पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे.भाविकांनी ई पास घेऊनच दर्शनासाठी यावं असं आवाहन सप्तशृंग देवी ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Saptashrungi temple
Saptashrungi temple

By

Published : Jan 3, 2022, 5:05 PM IST

Updated : Jan 3, 2022, 5:17 PM IST

नाशिक - राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता उद्रेक आणि नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टच्या (Saptashrungi temple nasik ) वतीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे. भाविकांनी ई- पास सेवेचा लाभ घेऊन दर्शनाला यावे. १० वर्षांखालील मुलांना अन् ६५ वर्षांवरील वृद्धांना मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे.

लसीकरणाचा एकही डोस नसेल तर सप्तशृंगी देवी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही तसेच १० वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या लहान मुलांना तसेच ६५ वर्षांवरील वृद्धांना मंदिरात प्रवेश नसणार आहे. ई-पास आणि ऑनलाईन दर्शन सुविधा पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे. (New Rules announced by Saptashrungi temple )भाविकांनी ई-पास घेऊनच दर्शनासाठी यावे, असं आवाहन सप्तशृंग देवी ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेले आहे.

सप्तशृंगी देवस्थानाकडून नियमावली जाहीर
वाढत्या कोरोनार रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय -
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावत असतात. नववर्षाच्या प्रारंभी भाविकांच्या गर्दीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. त्याचबरोबर राज्यात देखील कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ होत असल्याने भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सप्तशृंगी देवी संस्थानच्यावतीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी येताना राज्य सरकारने घालून दिलेल्या कोरोना नियमावलीचे पालन करणे अनिवार्य तसेच मंदिर प्रशासनाला भाविकांनी सहकार्य करावं, असं आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या सर्व आदेशांशी पूर्तता केली असली तरी गर्दीच्या नियोजनात भाविकांचे आवश्यक ते सहकार्य मिळण्याच्या हेतूने विश्वस्त संस्थेने www.ssndtonline.org संकेतस्थळावर ई-दर्शन पास उपलब्ध करून दिले आहेत. भाविकांनी ई-दर्शन / ऑनलाईन दर्शन पासच्या माध्यमातून दर्शन सुविधा उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. (New Rules announced by Saptashrungi temple)


१. कोविड-१९ अनुषंगिक लसीकरणाचे किमान १ किंवा २ डोस पूर्ण केलेल्या भाविकांना श्री भगवती मंदिरात प्रवेश उपलब्ध आहे. ज्या भाविकांना श्री भगवती मंदिर दर्शन रांगेत रोप वे अथवा पायी मार्गे प्रवेश करावयाचा असेल त्यांना लसीकरणाचे तपशील प्रवेशद्वारावर उपस्थित कर्मचारी वर्गाला सादर करणे अथवा दाखविणे बंधनकारक आहे.

२. वय वर्ष १० पेक्षा कमी तसेच वय वर्ष ६५ पेक्षा अधिक वयाच्या भाविक तसेच ग्रामस्थ यांना श्री भगवती मंदिरात प्रवेश उपलब्ध नसेल, पर्यायी संबंधित वयोगटातील भाविकांनी अथवा ग्रामस्थांनी मंदिरात प्रवेश मिळणेकामी आग्रह धरू नये.

३. श्री भगवती मंदिरात रोप वे अथवा पायी मार्गे मास्क शिवाय प्रवेश नसेल.

४. श्री भगवती मंदिर व परिसरात आवश्यकतेनुसार सामाजिक अंतर संबंधित जागांची चिन्हांकित केलेली ठिकाणाचा परिपूर्ण वापर करून सामाजिक अंतर पाळावे. जेणे करून गर्दीची परिस्थिती उद्भवणार नाही.

५. आवश्यकतेनुसार सॅनिटायझर व साबणाचा वापर करावा.

Last Updated : Jan 3, 2022, 5:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details