नाशिक : शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यासाठी नाशिक शहरातील नामांकित हॉटेल एक्सप्रेस इन येथे कोविड सेंटरची निर्मिती करण्यात येणार आहे. हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशनमार्फत हॉटेल एक्स्प्रेस इन येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात सेंटर उभारण्यासाठी नाशिक मनपा आयुक्तांची चर्चा करण्यात आली आहे.
नाशिकच्या 'या' नामांकित हॉटेलमध्ये सुरू होणार कोविड सेंटर, रुग्णांना मिळणार अत्याधुनिक सुविधा
कोरोनाबाधित रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यासाठी नाशिक शहरातील नामांकित हॉटेल एक्सप्रेस इन येथे कोविड सेंटरची निर्मिती करण्यात येणार आहे. हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशनमार्फत हॉटेल एक्स्प्रेस इन येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात सेंटर उभारण्यासाठी नाशिक मनपा आयुक्तांची चर्चा करण्यात आली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि रुग्णांवर डॉक्टरांकडून उपचार करण्यासाठी शहरातील नामांकित एक्स्प्रेस इन या हॉटेलमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यावेळेस मनपा आयुक्तांनी शासनाने घालून दिलेल्या नियम अटी शर्तीनुसार उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात येईल असे सांगण्यात आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिकच्या ज्युपिटर हॉटेल येथे देखील पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले होते.