महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यात 24 तासात 133 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 9 जणांचा मृत्यू - nashik covid 19 death cases

नाशिकच्या पंचवटी, वडाळा, जुने नाशिक भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, आरोग्य विभागाने या ठिकाणावर लक्ष केंद्रीत केले आहे. या भागात जनजागृती मोहिमही राबवली जात आहे.

nashik covid 19
जिल्हा रुग्णालय नाशिक

By

Published : Jul 8, 2020, 1:08 PM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मंगळवारी चोवीस तासात 133 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील 126 रुग्ण नाशिक शहरातील आहेत. 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 176 जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात नाशिक शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असून, तेथे रोज 100 ते 150 नवीन रुग्ण आढळून येत आहेत.

नाशिकच्या पंचवटी, वडाळा, जुने नाशिक भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, आरोग्य विभागाने या ठिकाणावर लक्ष केंद्रीत केले आहे. या भागात जनजागृती मोहिमही राबवली जात आहे.

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई -

नाशिकमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असून प्रशासनाने नियम अधिक कडक केले आहेत. सायं 7 ते सकाळी 5 पर्यंत जनता कर्फ्यू अधिक कडक करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच घराबाहेर पडणाऱ्या आणि मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.


नाशिक जिल्ह्याची आतापर्यंतची परिस्थिती -

- नाशिक जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्ण - 5796
- कोरोनामुक्त - 3336
- एकूण मृत्यू -293
- एकूण उपचार घेत असलेले रुग्ण - 2144
- नवीन संशयित- 629
- आतापर्यंत स्वॅब टेस्ट - 25 हजार 116

ABOUT THE AUTHOR

...view details