नाशिक - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून (13 जुलै) मागील 24 तासात नाशिक जिल्ह्यात 257 नवे कोरोना रुग्ण आढळले. एका दिवसात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात 7 हजार 259 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 341 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 4 हजार 789 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
महिन्याभरात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सात पट वाढ -
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित शहरात आढळून आले आहेत. मागील महिन्याभरात जवळपास साडेतीन हजार रुग्ण आढळून आले आहेत. तर मागील महिन्याभरात 140 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 2 हजार 463 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव असलेले भाग -
नाशिकच्या पंचवटी, जुने नाशिक, वडाळा, नाशिकरोड भागात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव असून हे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. या भागात दररोज बधितांमध्ये वाढ होत आहे. या भागातील कोरोना लक्षण असलेल्या संशयित रुग्णांची महानगरपालिका आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे.
मागील 24 तासात आढळलेले रुग्ण -