नाशिक - जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५८ हजार ६४५ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत २८ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरू असून आत्तापर्यंत २ हजार ४२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा उद्रेक सुरू असून रोज तीन ते चार हजार नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत २८ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरू असून आत्तापर्यंत २ हजार ४२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार ६४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सक्रिय आहे. त्यासाठी विविध पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. यात चाचण्या, लसीकरण व उपचाराच्या सुविधांवर भर देण्यात येत आहे.
हेही वाचा -"गेल्या वर्षभरापासून आम्ही बाहेर रस्त्यावरच आहोत" फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला
शहर व जिल्ह्यात उपचार घेत असलेले पॉझिटीव्ह रुग्ण -
ग्रामीण भागात नाशिक ५८४, बागलाण १ हजार ८३, इगतपुरी ३७१, मालेगाव ग्रामीण ८३१, चांदवड १ हजार ४०, सिन्नर ५७३, दिंडोरी ५१९, निफाड १ हजार ६७०, देवळा ८७१ , नांदगांव ५१५, येवला ३६४, त्र्यंबकेश्वर १६८, सुरगाणा १५२, पेठ ६१, कळवण ४१५ अशा एकूण ९ हजार २१७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १६ हजार ९२७, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८७९ तर जिल्ह्याबाहेरील २०८ अशा एकूण २८ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात एकूण १ लाख ८९ हजार ३०१ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी -
नाशिक ग्रामीणमध्ये ८२.७१ टक्के, नाशिक शहरात ८४.७८ टक्के, मालेगावात ७६.६५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८८.७४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.८१ इतके आहे. नाशिक जिल्ह्यात ९९० नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार १५८, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून २०६ व जिल्हा बाहेरील ७१ अशा एकूण २ हजार ४२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा -वर्षा राऊत यांना कोरोनाची लागण, संजय राऊत यांना करावी लागणार कोरोनाची चाचणी