महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिंडोरीच्या कसबेवणीत आढळला नवा कोरोना रुग्ण, परिसर सील - दिंडोरीतील कोरोना रुग्णांची संख्या

13 जूनला सदर रुग्ण कसबेवणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला. यानंतर त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. संबंधिताचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. आज या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

corona patient in dindori
कसबेवणीत आढळला नवा कोरोना रुग्ण

By

Published : Jun 15, 2020, 7:51 PM IST

नाशिक- दिंडोरी तालुक्यातील कसबेवणी येथील देशमुख गल्लीमधील एका 46 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. सदर व्यक्ती दोन आठवड्यांपूर्वी मालवाहतुकीच्या निमित्ताने नाशिक येथून सतत प्रवास करत होता. आजारी असल्याचे जाणवल्याने त्यांनी एका खासगी रुग्णालयात उपचारही घेतले होते.

13 जूनला हा रुग्ण कसबेवणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला. यानंतर त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. संबंधिताचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. आज या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना कोविड केअर सेंटरमध्ये हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजीत कोशिरे यांनी सांगितले.

हा रुग्ण राहात असलेली अपार्टमेंट आणि आजूबाजूचा परिसर कंटेनमेंट झोन आणि बफर झोन घोषित करण्यात आला आहे. सोबतच परिसरात आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. या भागात 14 दिवस सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येणार असल्याचे डॉ. सुजीत कोशिरे यांनी सांगितले

ABOUT THE AUTHOR

...view details