महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक : मालेगावात कोरोनाचा धुमाकूळ, पुन्हा 29 जण पॉझिटिव्ह; जिल्हाचा आकडा 829 वर - total corona cases in nashik

एकट्या मालेगावमध्ये कोरोनाबधितांचा आकडा 648 वर गेला असून नाशिक जिल्ह्यात कोरोना बांधितांची संख्या 829 झाली आहे. तर, आत्तापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 591 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मालेगावात आणखी 29 कोरोनाबाधितांची भर
मालेगावात आणखी 29 कोरोनाबाधितांची भर

By

Published : May 19, 2020, 5:07 PM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आज (मंगळवार) एकट्या मालेगावमध्ये 29 नवीन रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे, मालेगाव तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 648 वर गेली असून नाशिक जिल्ह्यातील कोरोना बधितांचा आकडा 829 वर पोहोचला आहे.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे पाठोपाठ मालेगावमध्ये देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी मालेगावमध्ये 208 रिपोर्ट्स पैकी 29 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ह्या रुग्णांमध्ये 3,4 व 15 वर्षीय बालकांचा समावेश आहे. तर, एकट्या मालेगावमध्ये कोरोनाबधितांचा आकडा 648 वर गेला असून नाशिक जिल्ह्यात कोरोना बांधितांची संख्या 829 झाली आहे. तर, आत्तापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 591 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात 7 हजार 559 जणांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 6 हजार 416 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 300 नमुन्यांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. तर, जिल्ह्यातील कंटनमेंट परिसरात 39 हजार 665 जणांचे सर्वेक्षण करण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details