महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनामुक्तीच्या दिशेने जाणाऱ्या मनमाडमध्ये आढळले नवीन 22 रुग्ण

सध्या 57 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 36 रुग्णांवर मनमाड कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर उर्वरित 21 जणांवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत.

मनमाड नगर परिषद
मनमाड नगर परिषद

By

Published : Jul 21, 2020, 8:21 PM IST

मनमाड (नाशिक) - कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मनमाड शहरात अचानक कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसात मनमाड शहरात नवे 22 रुग्ण आढळून आहेत. तर 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शहर व परिसरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 161 झाली आहे. तर यापैकी 101 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

सध्या 57 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 36 रुग्णांवर मनमाड कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर उर्वरित 21 जणांवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत.

कोरोनाबधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. सध्या शहरातील कोरोना सेंटर मध्ये 36 रुग्णावर उपचार सुरू आहेत.नाशिक येथे 21 जणांना उपचार देण्यात येत आहे. शहरातील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांच्या घशांच्या स्त्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यांचे चाचणीचे अहवाल प्रलंबित असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

नागरिकांमधील बेफिकीरीने वाढली चिंता

कोरोनावर प्रतिबंध आणि उपचारासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे. तर अनेक नागरिक हलगर्जीपणा करत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी विनाकारण गर्दी करणे, काम नसताना गावात फिरणे व मास्क न वापरणे यामुळेदेखील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. पावसाळ्याच्या दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यतादेखील डॉक्टर बोलवून दाखवित आहेत.

कोरोनाचा संसर्ग नियंत्रित ठेवण्याकरता शहरातील दुकाने सम-विषम पद्धतीने सुरू आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या घराच्या परिसरात औषध फवारणी करून तेथे प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. शहरात एकूण 29 प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेत. कोरोनाची साखळी तुटावी म्हणून सायंकाळी 5 नंतर संचारबंदीदेखील लागू करण्यात आलेली आहे. तरीही नागरिकांनी जागरूक राहून स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अशी आहे मनमाडमधील कोरोना संसर्गाची स्थिती

एकूण रुग्ण संख्या- 161
कोरोनाने मृत्यू-4
कोरोनामधून बरे झालेले रुग्ण-101
उपचार सुरू असलेले रुग्ण-57

ABOUT THE AUTHOR

...view details