येवला (नाशिक) - शिक्षिका आणि तिच्या मुलीवर किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या कुटुंबाकडून या दोघींना बेदम मारहाण करण्यात आली असून याबाबत येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षिका सुनिता पाटील आणि त्यांची मुलगी प्रियांका निकम ह्या हुडको कॉलनी परिसरात राहतात. त्यांच्या घराला लागून पोळ कुटुंब राहते. पोळ यांनी घराच्या बाजूला अतिक्रमण करून येण्या-जाण्याचा रस्ता बंद केल्याची तक्रार सुनिता यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे केली होती. ह्याचा राग मनात धरून 12 सप्टेंबरला सकाळी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान पोळ कुटुंबातील सदस्यांनी सुनिता पाटील आणि त्यांची मुलगी प्रियांका यांच्यावर लाठ्या-काठ्या, कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला.
हेही वाचा -ऑनलाइन शिक्षणप्रणाली गतिमान करण्यासाठी मोबाईल टॉवर जोडणीला प्राधान्य द्या - पालकमंत्री छगन भुजबळ