नाशिक -शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, ज्या कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणं नाही, अशा रुग्णांना शासनाने काही अटींवर घरात राहण्याची मुभा दिली आहे. मात्र, अशा होम क्वारंटाईन असलेल्यांच्या घरातून येणाऱ्या कचऱ्याचे विलगीकरण होत नसल्याने घंटागाडी कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असून आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात 25 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून, 700 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शहरात 1 हजार 675 प्रतिबंधित क्षेत्र असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले 36 हजार हाय रिस्क नागरिक नाशिक शहरात आहेत. ज्या कोरोनाबाधितांना कोरोनाचे सौम्य लक्षणं किंवा लक्षणे नाहीत, अशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. अशा रुग्णांना आपले वापरलेले मास्क, सॅनिटायझरची बाटली यांची विल्हेवाट लावण्यापूर्वी ते तीन दिवस एका कागदामध्ये बांधून ठेवणे बंधनकारक आहे. तसेच जर होम क्वारंटाईन रुग्णाच्या घरातील कचरा असेल तर त्याची माहिती घंटागाडी कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे आहे. ज्यामुळे तो कचरा वेगळा ठेवण्यात येईल. मात्र, असे असतानाही अनेकांकडून या नियमाला फाटा देत कचरा थेट घंटागाडीत टाकतात. यामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात आहे.
घंटागाडी कर्मचाऱ्यांना सूचना