नाशिक: पुणे, नागपूर येथील काही मंदिरात भाविकांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय मंदिर फेडरेशन, ग्रामस्थ व विश्वस्त मंडळाने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आता नाशिकच्या वणी येथील सप्तशृंगी गडावर भाविकांना मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी पूर्ण पेहरावात आल्यावरच देवीचे दर्शन घेता येणार आहे. आरती आणि पूजेच्या कालावधीत आलेल्या आणि नोंदणी केलेल्या भाविकांनाच गाभाऱ्यात दर्शन घेता येणार आहे. तर पुरुषांना सोवळे आणि महिला भाविकांना साडी नेसून आरतीनंतर दर्शन घेता येणार असल्याचा निर्णय लवकरच ट्रस्टकडून घेतला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे यापुढे भाविकांना सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाताना पूर्ण पेहरावात जावे लागणार आहे.
Temple Dress Code : ....तर मंदिरातील उघड्याबंब पुजाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे; भुजबळांचा सल्ला - मंदिरातील ड्रेसकोडवर छगन भुजबळ
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवी मंदिरात आता ड्रेसकोड लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे; मात्र आधी मंदिरातील पुजाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे. मग ड्रेसकोड लागू करावा, असे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. नाशिकच्या भुजबळ फार्म तेथे आज (सोमवारी) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
![Temple Dress Code : ....तर मंदिरातील उघड्याबंब पुजाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे; भुजबळांचा सल्ला Bhujbal On Temple Dress Code](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/1200-675-18626045-thumbnail-16x9-bhujbal.jpg)
मग पुजारीसुद्धा अर्धनग्न असतात:सर्वच ठिकाणी शाळेला सुट्टी लागल्यावर एखादा मुलगा मंदिरात हाफ पँट घालूनच जाणार. वाट्टेल तसे कापडे घालू नये, नीटनेटके कपडे घालावे हे मी समजू शकतो. सर्वांनीच जर नीटनेटके कपडे घालायचे असतील तर मंदिराच्या आत उघडेबंब असलेल्या पुजाऱ्यांनीसुद्धा अंगात सदरा घालावा. ते सुद्धा अर्धनग्न नसतात का? असा संतप्त सवाल माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
हे लोकतंत्र आहे का मनुतंत्र?दिल्लीत नव्या संसद भवनाची गरज होती. मात्र, ज्या पद्धतीने त्या संसद भवनाचा उद्घाटन सोहळा झाला, ते पाहून अतिशय वाईट वाटले. स्वातंत्र्यानंतर झालेल्या संसदेच्या सोहळ्यात वेगवेगळ्या पक्षांचे, विचारांचे नेते एकत्र आले होते. परंतु, काल धर्मकांड सुरू होते. कुठूनतरी उघडेबंब लोक आणले होते. त्याच्यामध्ये एकटे पंतप्रधान दिसत होते. हे लोकतंत्र आहे की, मनुतंत्र हेच कळत नाही, असा संताप छगन भुजबळांनी व्यक्त केला. तुम्हाला विरोधी पक्षाचे लोक नको होते तर किमान तुमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते किंवा तुमच्या मित्र पक्षाच्या नेत्यांना सोबत घेऊन कार्यक्रम करायचा होता. हा सोहळा संपूर्ण जग बघत होता. त्यांना काय वाटेल? असा प्रश्न देखील छगन भुजबळांनी विचारला.
हेही वाचा: