महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठीही तयारी ठेवा - छगन भुजबळ - Nashik Municipal Corporation Election News

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटन अधिक मजबूत करत कामाला लागावे. तसेच वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल, याची वाट न बघता प्रसंगी निवडणूक स्वबळावर लढण्याची देखील तयारी ठेवा, असे आदेश पालकमंत्री मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. कोणीही गाफील न राहता वरिष्ठ पातळीवरील निर्णयाची वाट न बघता महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

नाशिक महानगरपालिका निवडणूक न्यूज
नाशिक महानगरपालिका निवडणूक न्यूज

By

Published : Feb 14, 2021, 7:31 PM IST

नाशिक -आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटन अधिक मजबूत करत कामाला लागावे. तसेच वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल, याची वाट न बघता प्रसंगी
निवडणूक स्वबळावर लढण्याची देखील तयारी ठेवा, असे आदेश पालकमंत्री मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याची आवश्यकता

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक शहरातील राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथील कार्यालयात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी बोलत होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याची आवश्यकता असून संघटना अधिक बळकट करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे. सामाजातील प्रत्येक वंचित घटकांपर्यंत पोहचून त्याच्या समस्या जाणून घ्या. पक्षाच्या वतीने केलेली विकास कामे नागरिकांपर्यंत पोहचवावी. कुठलाही नागरिक संकटात असेल तर त्यासाठी धावून जाण्याची आपली तयारी असावी. यामध्ये युवकांची भूमिका अधिक महत्त्वाची असून त्यांनी यासाठी सदैव तत्पर असण्याची आवश्यकता आहे. कोरोना काळात आपण नागरिकांसाठी चांगली कामे केली आहे. ती कामे यापुढील काळातही अविरत सुरु ठेवावी. कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येकाची असल्याचे भुजबळ यानी सांगितले आहे.

वरिष्ठ पातळीवरील निर्णयाची वाट न बघता स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा

पक्षाच्या प्रचार आणि प्रसारासाठी सर्वांनी पुढे येऊन आपापल्या प्रभागात लोकहिताची कामे करावी. नागरिकांचे प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. आगामी निवडणुका कशा पद्धतीने लढायच्या आहेत. याबाबत पक्षातील वरिष्ठ निर्णय घेतील. तोपर्यंत आपल्याला शांत बसून चालणार नाही. प्रसंगी स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे. त्यामुळे कोणीही गाफील न राहता वरिष्ठ पातळीवरील निर्णयाची वाट न बघता महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशा सूचना भुजबळानी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

साहित्य संमेलनात कार्यकर्त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान द्यावे

यावेळी छगन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांनी कोविड-१९ च्या काळात शहर व परिसरात केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. तसेच नाशिकमध्ये यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून नाशिककरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे नाशिकच्या साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान द्यावे असे भुजबळ यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details