महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवार सोमवारी नाशिक दौऱ्यावर; विधानसभानिहाय बैठकीचे आयोजन - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवन, नाशिक येथे विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी

By

Published : Sep 14, 2019, 9:29 PM IST

Updated : Sep 14, 2019, 9:38 PM IST

नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवार (१६ सप्टेंबर) नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत विधानसभा मतदारसंघवार कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.

शरद पवार सोमवारी नाशिक दौऱ्यावर

हेही वाचा - 'वंचित'मुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत फायदा - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवन, नाशिक येथे विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा बिन लादेन ठार; डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती

दुपारी १२ वाजता बागलाण, १२.३० वाजता कळवण-सुरगाणा, १ वाजता- येवला-लासलगाव, १.३० वाजता- नांदगांव, २.३० वाजता- निफाड, ३ वाजता- दिंडोरी-पेठ, ३.३० वाजता- देवळाली, सांयकाळी ४ वाजता- नाशिक पूर्व, ४.३० वाजता- नाशिक पश्चिम, ५ वाजता- मालेगाव मध्य, ५.१५ वाजता- मालेगाव बाह्य, ५.३० वाजता- चांदवड-देवळा, ५.४५ वाजता- सिन्नर, ६ वाजता- नाशिक मध्य, ६.१५ वाजता इगतपुरी-त्र्यंबकेश्वर अशा बैठका होणार आहे.

हेही वाचा - महाजनादेश यात्रेत 'एकच वादा अजित दादा'चा जयघोष, पोलिसांचा लाठिचार्ज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन समीर भुजबळ यांनी केले आहे.

Last Updated : Sep 14, 2019, 9:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details