महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...त्यामुळे नेते नाराज तर होणारच; छगन भुजबळांनी दिले स्पष्टीकरण - छगन भुजबळ

भुजबळ म्हणाले,मंत्रालयातील काही खाती लहान आहेत. त्यामुळे काही नाराज होत आहेत. मात्र, मला कोणतेही खाते दिले तरी चालेल. मला कल्पना नाही की, मला कोणते खाते मिळणार आहे. कृषीमंत्री पदाबद्दल मी काही ऐकलं नाही हे वर्तमान पत्रातून वाचलं असल्याचेही ते म्हणाले. मंत्री पद न मिळाल्याने पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. मात्र, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. राष्ट्रवादीत प्रकाश सोळंके नाराज होते. मात्र आम्ही त्यांची नाराजी दूर केली आणि ते थांबले, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी प्रकाश सोळंके यांच्या राजीनाम्याच्या भूमिकेवर दिले.

...त्यामुळे नेते नाराज तर होणारच; छगन भुजबळांनी दिले स्पष्टीकरण
...त्यामुळे नेते नाराज तर होणारच; छगन भुजबळांनी दिले स्पष्टीकरण

By

Published : Jan 1, 2020, 4:32 PM IST

Updated : Jan 1, 2020, 6:58 PM IST

नाशिक- महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळविस्तारानंतर राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाले. मात्र,पक्षाचे नेते सर्वांचे समाधान करू शकत नाही, तीन पक्ष आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच मंत्री पद देणे शक्य नाही. काही नते नाराज होणारच, असे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मंत्री छगन भुजबळ

भुजबळ म्हणाले, मंत्रालयातील काही खाती लहान आहेत. त्यामुळे काही नाराज होत आहेत. मात्र, मला कोणतेही खाते दिले तरी चालेल. मला कल्पना नाही की, मला कोणते खाते मिळणार आहे. कृषीमंत्री पदाबद्दल मी काही ऐकलं नाही हे वर्तमान पत्रातून वाचलं असल्याचेही ते म्हणाले. मंत्री पद न मिळाल्याने पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. मात्र, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. राष्ट्रवादीत प्रकाश सोळंके नाराज होते. मात्र आम्ही त्यांची नाराजी दूर केली आणि ते थांबले, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी प्रकाश सोळंके यांच्या राजीनाम्याच्या भूमिकेवर दिले.


मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेना नेते संजय राऊत नाराज आहेत. मात्र, मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही. मात्र, राऊत यांनी ते नाराज नसल्याचे सांगितले. तसेच मेट्रोला विरोध केलेला नाही. मुंबईची लोकसंख्या जास्त आहे. मात्र नागपूरचे बघा काय झाले? आवश्यकता असेल तर त्याचा अभ्यास करून निर्णय घ्यावा, असे मतही यावेळी भुजबळ यांनी व्यक्त केले. शहर बसेसेवेबद्दल सर्व लोकप्रतिनिधींनी विचार करावा. हा नाशिकरांवर्ती टॅक्स बसणार आहे. त्यापेक्षा बस महामंडळाला पैसे दिले तर चांगलेच आहे. नाहीतर १०० कोटींचा भुर्दंड पडेल, असेही भुजबळ म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तारावर आमच्या मुळे काही रखडले नव्हते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच नियमित पैसे भरणाऱ्यांसाठी सरकार चांगली योजना आणणार आहे. कर्जमाफीवरही तसा निर्णय घेतला आहे, असेही मत भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.

Last Updated : Jan 1, 2020, 6:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details