महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजकीय धामधुमीत शरद पवार शेतकऱ्याच्या बांधावर, पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा - ncp chief sharad pawar in nashik

राज्यात यावर्षी परतीच्या पावसामुळे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज (शुक्रवारी) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांना घोटी टोल नाका परिसरातील नुकसानग्रस्त भात पिकांची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.

राजकीय धामधुमीत शरद पवार शेतकऱ्याच्या बांधावर

By

Published : Nov 1, 2019, 1:15 PM IST

Updated : Nov 1, 2019, 5:25 PM IST

नाशिक -राज्यात यावर्षी समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना तारले आहे. मात्र, परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याला मारले आहे. हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडातून अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. ही गंभीर बाब आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण अग्रक्रमाने प्रयत्न करू, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.

राजकीय धामधुमीत शरद पवार शेतकऱ्याच्या बांधावर

राज्यात यावर्षी परतीच्या अवकाळी पावसामुळे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज (शुक्रवारी) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी घोटी टोल नाका परिसरातील नुकसानग्रस्त भात पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.

तालुक्यातील महत्वाचे पीक असलेलो भात पीक कापणीला आले आहे. मात्र, अवकाळी पावसाने शेतात पाणी साचून उभी असलेली भातपिके सडली आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, अशी माहिती तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने आमदार हिरामण खोसकर यांनी पवार यांच्यापुढे मांडली. तसेच रस्त्यालगतच्या भाताचे सडलेल्या पेंढ्याची पवार यांनी पाहणी केली.

तालुक्यात झालेल्या भातपीका नुकसानीमुळे खऱ्या अर्थाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांना पुन्हा सावरण्यासाठी शासकीय स्तरावर मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली. दरम्यान, लोकनेते गोपाळराव गुळवे यांच्या जयंतीनिमित्ताने शरद पवार यांनी बाजार समितीच्या आवारातील पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी स्थानिक आजी-माजी आमदार, खासदार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Last Updated : Nov 1, 2019, 5:25 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details