नाशिक Navratri 2023 : नाशिकमध्ये यंदा नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून गरबा, दांडिया कार्यक्रमांना (Garba Dandiya) तरुणाईचा जल्लोष दिसून येत आहे. तासन तास गरबा खेळून चेहऱ्यावर थकवा दिसू नये म्हणून खास वॉटरप्रूफ एचडी मेकपला महिलावर्गाकडून सर्वाधिक पसंती मिळतं आहे. मेकअप आर्टिस्ट या मेकअपसाठी 2000 ते 2500 रुपये आकारत आहेत.
ब्युटी पार्लरमध्ये तरुणाईची गर्दी : नवरात्री म्हणजे भक्ती, आनंदाचा सण. यावर्षी नाशिकमध्ये 100 हुन अधिक ठिकाणी गरबा, (Garba) दांडिया रास (Dandiya Raas) कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. सर्वच दांडिया रासमध्ये अबालवृद्ध सोबतच तरुणाईचा लक्षणीय सहभाग दिसून येतोय. देवीचा जागर करत खेळल्या जाणाऱ्या गरब्यादरम्यान थकवा येऊ नये आणि सुंदर दिसावे यासाठी युतीसह युवकही मेकअपवर विशेष लक्ष केंद्रित करत आहेत. तर नाशिकमध्ये दुपारपासून शहरातील ब्युटी पार्लरमध्ये तरुणाईची गर्दी दिसून येत आहे.
वॉटरप्रूफ एचडी मेकअपला मागणी :गरब्यातील प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळ्या लुकचे नियोजन करण्यात येते. ड्रेस आणि लुकला साजेसा मेकअप केला जात आहे. या नवरात्रीला हायलाईट केलेल्या वॉटरप्रूफ एचडी मेकअपला सर्वाधिक मागणी आहे. नवरात्रीचा मेकअप (Navratri Makeup) हा जरा हटके लूक असतो. तासन तास गरबा खेळूनही चेहऱ्यावर थकवा दिसू नये, रंगीत प्रकाशात चेहरा आणि डोळे हायलाईट व्हावेत यासाठी खास वॉटरप्रूफ एचडी मेकअपसह शिमर लूक, ग्लिटरी लूकला तरुणी, महिलावर्गांकडून सर्वाधिक पसंती मिळत आहे. हा मेकअप करण्यासाठी एकावेळी 2000 ते 2500 रुपये आकारले जात असल्याने, शहरात केवळ मेकअपच्या माध्यमातून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
वेशभूषेला साजेसा मेकअप : नवरात्र उत्सवात गरबा प्रेमी पारंपारिक वेशभूषा परिधान करत गरबा, रास दांडियाचा आनंद लुटत असतात. वेशभूषाप्रमाणे सर्वांचे लक्ष वेधले जाईल, हायलाईट होईल अशा मेकअपला सर्वाधिक पसंती दिली जाते. यंदा नवरात्रात नऊ दिवस बुकिंग झाली आहे. तर या मेकअपचा चेहऱ्यावर कुठलाही दुष्परिणाम होत नाही असं मेकअप आर्टिस्ट मेघा पाटील यांनी (Makeup Artist Megha Patil) सांगितलं.
डोळ्यावर लक्ष केंद्रित केले जाते: नवरात्र उत्सवातील मेकअप इतर वेळीकेल्या जाणाऱ्या मेकअप पेक्षा वेगळा असतो. त्यात डोळ्यावर जास्त फोकस केला जातो. डोळे एकदम नक्षीदार केलेले असतात. गरबा आयोजनाच्या ठिकाणी रंगीत लाईट लावले असतात. हा मेकअप रात्रीसाठीच असल्यामुळे चांगला चमकतो. असं मेकअप आर्टिस्ट मेघा पाटील सांगतात.
आधीपासून तयारी : दरवर्षी आम्ही एक महिना अगोदर दांडिया, गरबा खेळण्याची प्रॅक्टिस करतो. आमचा 50 मुला, मुलींचा ग्रुप आहे. नऊ दिवस रोज वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा आम्ही करतो. दररोज तीन ते चार तास आम्ही गरबा खेळतो. अशात चेहऱ्यावर थकवा जाणवतो, घाम येतो, त्यामुळे आम्ही यंदा वॉटरप्रूफ एचडी मेकपला निवडला आहे. संध्याकाळी लाईट मध्ये हा मेकअप उठून दिसतो आणि चेहऱ्यावर घाम ही येत नाही. त्यामुळे न थकता आणि तासन तास गरबा करतो. असं गरबा प्रेमी आश्विनी गोस्वामी यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- Bhagyashree Dharmadhikari Record : सलग आठ तासांत 64 युवतींचा मेकअप; नाशिकच्या भाग्यश्री धर्माधिकारींचा नवा रेकॉर्ड
- Veshbhusha Shastra Show : नाशिकच्या 'वेशभूषा शास्त्र शो' मध्ये अवतरल्या अप्सरा; पाहा व्हिडिओ
- Veshbhusha Shastra Show : नाशिकच्या 'वेशभूषा शास्त्र शो' मध्ये अवतरल्या अप्सरा; पाहा व्हिडिओ