महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 27, 2022, 1:29 PM IST

ETV Bharat / state

Natya Parishad awards : डाॅ. माेहन आगाशे, संजय पवार, गिरीश सहदेव यांना नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, (All India Marathi Natya Parishad) नाशिक शाखेच्या वतीने एक वर्षाआड देण्यात येणाऱ्या पुरस्तकारांची घाेषणा करण्यात आली. 2022 चे वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार (Shirwadkar Writing Award) संजय पवार, वंसत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार (Vansat Kanetkar Rangkarmi Award) डाॅ. माेहन आगाशे यांना तर बाबुराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार गिरीश सहदेव जाहीर झाले आहेत.

Dr. Mahen Agashe
डाॅ. माेहन आगाशे

नाशिक : अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने वि. वा. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर पुरस्कार 1998 पासून दिले जातात. पंचवीस हाजार रुपये राेख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर शहरातील ज्येष्ठ नाट्यकर्मींसाठी सुरू करण्यात आलेले, बाबुराव सावंत पुरस्कार 2014 सालापासून दिले जातात. 11 हजार रुपये राेख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कदम, ढगे यांच्यासह डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, शेफालीताई भुजबळ, रवींद्र ढवळे आणि इश्वर जगताप यांचा पुरस्कार निवड समितीत समावेश हाेता. पुरस्कार समितीच्या पाचही सदस्यांनी या दिग्गज नावांवर एकमताने शिक्कामाेर्तब केले.शासनाने दिलेले काेराेनाचे निर्बंध आता हळुहळू शिथील हाेत आहेत. त्यामुळे लवकरच पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या तारखा घेऊन त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारांची घोषणा परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details