नाशिक- शहरातील सुप्रसिद्ध 'सुला' वाइनने आता देशासह परदेशात देखील मजल मारली आहे. ही वाईन आता चीनच्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाली असून यामुळे नाशिकमधील द्राक्ष उत्पादकांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.
साध्य भारतीय बाजार पेठेत ६५ टक्के वाइन सुला विक्री करते. आशिया, युरोप, अमेरिका, कॅनडा, इटली, फ्रान्ससह ३० देशात सुला वाईनची निर्यात केली जाते. चीन हा वाइन बाजारपेठेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि त्यातच नाशिकची सुला वाइन विक्रीसाठी चीनमध्ये दाखल झाल्याने हा वाइन उत्पादकांसाठी मोलाचा दगड ठरणार आहे. चीनच्या नानजिंग ग्लोरी इंटरनॅशनल कंपनीसोबत सुला वाइनने भागीदारी केली आहे. नजिंग ग्लोरी ही चीनमधील मोठी आयातदार आणि वाइन वितरण कंपनी आहे.