कोरोनाचे संकट फूल उत्पादकांच्या मुळावर.. मागणी नसल्याने शेतकऱ्याने फुलशेती केली जमीनदोस्त - लॉकडाऊनमुळे फूलशेती संकटात
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असून, यामुळे फूल शेती करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडले आहेत. लग्न समारंभ, मंदिरे,धार्मिक विधी तसेच इतर एकत्रित येत साजरे होणारे सोहळे बंद असून यामुळे फुलांची मागणी घटली आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यातील एका शेतकऱ्याने पॉलीहाऊस मधील 30 गुंठे फूलशेती जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
![कोरोनाचे संकट फूल उत्पादकांच्या मुळावर.. मागणी नसल्याने शेतकऱ्याने फुलशेती केली जमीनदोस्त nasik Flower growers farmers in crisis](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7313860-thumbnail-3x2-nsk.jpg)
शेतकऱ्याने फुलशेती केली जमीनदोस्त
नाशिक -कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे फूलशेती करणारा शेतकरी अडचणीत सापडला आहे. लॉकडाऊनमुळे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम नसल्याने फुलांना मागणी नाही. यामुळे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील कांचन गाव येथील प्रगतशील शेतकरी जनार्दन गव्हाणे यांनी पॉलीहाऊस मधील 30 गुंठे फुलशेती जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनाचे संकट फूल उत्पादकांच्या मुळावर
Last Updated : May 23, 2020, 2:53 PM IST