नाशिक -नाशिकचे सिव्हिल हॉस्पिटल तिसऱ्यांदा देशात अव्वल आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत केंद्रीय कायाकल्प स्पर्धेत हॉस्पिटलने बाजी मारली आहे. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाने दर्जेदार रुग्णसेवेच्या बळावर सलग तिसऱ्या वर्षी देशात पहिला क्रमांक पटकावला. तसेच 50 लाखांचे पारितोषिक मिळवले आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या यशामुळे नाशिकचे नाव देशपातळीवर चमकले आहे. विशेष म्हणजे, डॉ. सुरेश जगदाळे यांनी कायाकल्प स्पर्धा सुरू झाल्यावर पहिले बक्षीस सातारा रुग्णालयाला मिळवून दिले होते. आता त्यांच्या कार्यकाळात नाशिक जिल्हा रुग्णालयाला देखील सलग तीनदा कायाकल्प पुरस्कार मिळाले. असा विक्रम करणारे डॉ. सुरेश जगदाळे देशातील एकमेव सिव्हिल सर्जन ठरले आहे.
कायाकल्प स्पर्धा : नाशिकचे सिव्हिल हॉस्पिटल तिसऱ्यांदा देशात अव्वल - कायाकल्प पुरस्कार
नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या यशामुळे नाशिकचे नाव देशपातळीवर चमकले आहे. विशेष म्हणजे, डॉ. सुरेश जगदाळे यांनी कायाकल्प स्पर्धा सुरू झाल्यावर पहिले बक्षीस सातारा रुग्णालयाला मिळवून दिले होते. आता त्यांच्या कार्यकाळात नाशिक जिल्हा रुग्णालयाला देखील सलग तीनदा कायाकल्प पुरस्कार मिळाला आहे.
नाशिक पाठोपाठ मालेगाव सामान्य रुग्णालयाला देखील कायाकल्प पुरस्काराचे 20 लाखांचे द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. विशेष म्हणजे, राज्यात सर्वाधिक बक्षीसे देखील नाशिक जिल्हा रुग्णालयाला मिळाले. या यशामागे तत्कालीन सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. निखिल सौंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, मेट्रेन सीमा काळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका सर्व कर्मचारी यांचे कष्ट आहेत.
'या' नऊ रुग्णालयांना देखील प्रत्येकी एक लाखांचे पारितोषिक
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयापाठोपाठ केंद्रीय आरोग्य विभागाकडून झालेल्या स्पर्धेत रुग्णांना चांगली सेवा दिल्याबद्दल पेठ, येवला, निफाड, उमराणे, चांदवड, कळवण, घोटी, त्र्यंबकेश्वर या उप-रुग्णालयांना देखील प्रत्येकी 1 लाखाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहेत.