नाशिक - नाशिक जिल्ह्यात घरकुल आवास योजनेच्या सव्वा लाखांचा लाभ घेणाऱ्या 49 हजार 557 जणांना जिल्हा परिषदेने घरचा रस्ता दाखवला आहे. केंद्र सरकारमार्फत गरीब व बेघर नागरिकांसाठी पंतप्रधान आवस योजनेच्या सव्वा लाखाच्या घरकुलासाठी घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. या सर्वांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुलासाठी एक लाख वीस हजार रुपयांचा लाभ दिला जातो. त्यासाठी शासनाने एनआयसी केंद्रामार्फत नाव नोंदणी केलेल्यांच्या आर्थिक परिस्थितीची पडताळणी केली आहे. त्यामध्ये 2 लाख 88 हजार पैकी 49 हजार 557 जणांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
या अंतर्गत दिला जातो लाभ
पंतप्रधान, रमाई आणि शबरी आवास योजनेतून दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना घरकुल योजना लाभ दिला जातो. तर, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागातील गरीब, अल्प व अल्पभूधारक व कमी उत्पन्न असलेल्या आणि हक्काचे घर नसलेल्यांना घरकुल योजना आहे. त्यासाठी (2018-19)या कालावधीत गावपातळीवर सर्वेक्षण केले होते.