महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्यांचे नाशिक येथे दहन - पुतळ्यांचे दहन

उन्नाव प्रकरणातील आरोपीला भाजप सरकार पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा आरोप नाशिक युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारवर केला आहे. सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्यांचे नाशिक येथे दहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्यांचे नाशिक येथे दहन

By

Published : Aug 1, 2019, 8:22 PM IST

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्यांचे नाशिक युवक काँग्रेस व युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दहन केले. उन्नाव बलात्कार प्रकरणी आरोप असलेले कुलदीप सिंह सेंगर यांना मोदी सरकार पाठीशी घालत आहे, असा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. 'मोदी सरकार हाय हाय', 'योगी सरकार हाय हाय', अशा सरकार विरोधी घोषणा, देत पुतळ्यांना जोडे मारले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्यांचे नाशिक येथे दहन
उन्नाव प्रकरणातील पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याऐवजी हे सरकार आपल्याच सदस्याला वाचवण्यात मग्न आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कडक कारवाई योगी सरकारने केलेली नाही. हेच सरकार 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा नारा देत आहे. तर दुसरीकडे मुलींवर होणाऱ्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालत आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यालाच आता भाजप सरकारने 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या मोहिमेचा दूत नेमा, अशी मागणीही नाशिक जिल्हा युवक काँग्रेसने केली. नाशिकमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील, युवक प्रदेश सचिव कल्याणी रांगोळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. महिला सुरक्षेबद्दल खोटा कळवळा दाखवत आहे. आपल्याच नेत्यांकडून महिलांवर होणारा अत्याचार मूग गिळून गप्प बघत बसणाऱ्या भाजप सरकारचा युवती काँग्रेसने बांगड्या भेट देऊन निषेध व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details