नाशिक - मागील दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील एकूण 23 लहान-मोठी धरणे 100 टक्के भरली आहेत. यामुळे सध्या 17 धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण देखील 100 टक्के भरले असून, यामधून 2284 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सुरू आहे. यामुळे नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झाली असून, गोदावरीला पूर आला आहे.
नाशिकमध्ये मुसळधार.. 17 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू
मागील दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील एकूण 23 लहान-मोठी धरणे 100 टक्के भरली आहेत. यामुळे सध्या 18 धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
या पुरामुळे रामकुंड परीसरातील लहान मंदिरे पाण्याखाली गेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पूर भागात फोटो, सेल्फी काढण्यास मनाई करण्यात आली आहे.
'या' धरणांमधून होतोय पाण्याचा विसर्ग
गंगापूर धरण - 2284 क्युसेक
भावली धरण - 135 क्युसेक
काशपी धरण - 422 क्युसेक
आळंदी धरण - 687 क्युसेक
दारणा धरण - 3215 क्युसेक
पालखेड धरण - 5250 क्युसेक
नांदुरमध्यमेश्वर धरण - 16,788 क्युसेक
करंजवण धरण - 900 क्युसेक
कडवा धरण - 2544 क्युसेक
ओझरखेड धरणं - 2637 क्युसेक
वालदेवी धरणं - 1050 क्युसेक
वाघाड धरण - 1014 क्युसेक
पुणेगाव - 932 क्युसेक
चणकापूर - 1816 क्युसेक
ठेंगोडा - 6311 क्युसेक
हरणबारी - 523 क्युसेक
केळझर - 198 क्युसेक