महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नाशिकच्या उज्वल भवितव्यासाठी समीर भुजबळांना विजयी करा', शिवसेना-भाजप नेत्यांच्या नावे मेसेज व्हायरल - vcongress

चौथ्या टप्प्यातील मतदानाला काही तास बाकी आहेत. अशातच जिल्ह्यात युतीतील नेत्यांच्या नवाने राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना मतदान करण्याचे खोटे संदेश प्रचंड प्रमाणात वायरल करण्यात आले आहेत. बी डब्ल्यू नाशिक या अकाऊंटवरून हे मेसेज पाठवण्यात येत आहे.

'नाशिकच्या उज्वल भवितव्यासाठी समीर भुजबळांना विजयी करा', शिवसेना-भाजप नेत्यांचे नावे मेसेज व्हायरल

By

Published : Apr 28, 2019, 11:36 PM IST

नाशिक - निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना नाशकात व्हायरल एसएमएस आणि व्हिडिओने उमेदवारांची चांगलीच झोप उडवली आहे. शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याकडून याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.

'नाशिकच्या उज्वल भवितव्यासाठी समीर भुजबळ यांना विजयी करा', अशा आशयाचा मेसेज शिवसेना-भाजप नेत्याच्या नावाने नाशिकमध्ये फिरत आहेत. तर, दूसरीकडे ग्राफिक्सचा गैरवापर करून भुजबळ यांचा जाहीर माफीनामा, अशा आशयाच्या बातमीचा बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.

चौथ्या टप्प्यातील मतदानाला काही तास बाकी आहेत. अशातच जिल्ह्यात युतीतील नेत्यांच्या नवाने राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना मतदान करण्याचे खोटे संदेश प्रचंड प्रमाणात वायरल करण्यात आले आहेत. बी डब्ल्यू नाशिक या अकाऊंटवरून हे मेसेज पाठवण्यात येत आहेत.

'नाशिकच्या उज्वल भवितव्यासाठी समीर भुजबळांना विजयी करा', शिवसेना-भाजप नेत्यांचे नावे मेसेज व्हायरल

याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि पालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. तर, सिन्नरचे शिवसेना आमदार राजाभाऊ वाजे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

खोडसाळपणे एसएमएस पसरवून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न कुणीतरी करत असल्याचे हे षडयंत्र आहे, असे समीर भुजबळ यांनी सांगितले. याबाबत पोलिसात तक्रार दाखल झालेली असून त्यावर योग्य ती कारवाई होईल सत्य बाहेर येईल. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेबांच्या पुरोगामी विचारसरणी वर चालणारा पक्ष आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवीत असताना आम्हाला विरोधी पक्षाच्या कुबड्या घेण्याची गरज नाही. आम्ही निवडणुकीच्या विकासाच्या आणि प्रगतीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवीत आहोत, असेही ते म्हणाले.
खोट्या मेसेज आणि व्हिडिओ बाबत नेत्यांकडून तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आता यामागे नक्की कुणाचा हात आहे, हे शोधण्यासाठी पोलिसांचा सायबर सेल कामाला लागला आहे. खोडसाळपणातून हा प्रकार करण्यात आला की राजकीय लाभासाठी कुणी ठरवून हे केले, याबाबत पुढील तपास नाशिक सायबर पोलिस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details