नाशिक -लेखानगर परिसरात सुंदरबन कॉलनी येथे रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी सात वाहनांच्या काचा फोडल्या. यामुळे परिसरात दहशत निर्माण होऊन नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
नाशिक - सिडकोत वाहनांच्या काचा फोडल्या काठी व दगडाने वाहनांच्या काचा फोडून दहशत -
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, लेखानगर परिसरातील सुंदरबन कॉलनी येथे रात्री नऊ वाजेच्या सुमारास दुचाकीवर अज्ञात समाजकंटक आले व त्यांनी काठी व दगडाने घरासमोर पार्किंग केलेल्या सात वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली आहे.
शहरात नाका बंदी असताना टोळके धुडगूस घालता कसे -
वाहनांच्या काचा फोडून भामटे फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचुन पाहणी केली आहे. अज्ञात समाजकंटकांनी सात वाहनांच्या काचा का फोडल्या हे अद्याप समजू शकले नाही. परंतु शहरात नाका बंदी असताना टोळके धुडगूस घालता कसे असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन पोलीस पुढील तपास करत आहेत. काचा फोडणारे आरोपींची माहिती मिळाली असून लवकरच त्यांना अटक केले जाईल असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
हेही वाचा - पेढी धरणावर गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या