महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये गेल्या सात महिन्यात एक लाखांपेक्षा जास्त बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई - नाशिक वाहतूक पोलीस कारवाई

नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांविरोधात मोहीम उघडत, ऑनलाइन दंड वसुली प्रक्रियेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली आहे. यात 1 लाख 15 हजार 720 वाहनचालकांना 3 कोटी 21 लाख 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापैकी 85 लाख 10 हजार रुपयांची वसुली करण्यात आली असून 23 लाख 59 हजार रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करणे बाकी आहे.

Traffic Police
वाहतूक पोलीस

By

Published : Aug 25, 2020, 3:18 PM IST

नाशिक - जानेवारी 2020 ते जुलै 2020 या सात महिन्यात वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम राबवत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1 लाख 15 हजार 720 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली. या कारवाईमधून 3 कोटी 21लाख 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सात महिन्यात एक लाखांपेक्षा जास्त बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई

नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांविरोधात मोहीम उघडत, ऑनलाइन दंड वसुली प्रक्रियेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली आहे. यात 1 लाख 15 हजार 720 वाहनचालकांना 3 कोटी 21 लाख 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापैकी 85 लाख 10 हजार रुपयांची वसुली करण्यात आली असून 23 लाख 59 हजार रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करणे बाकी आहे. ई चलान सुविधा मिळाल्याने वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांन विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. वाहन चालवताना परवाना नसणे, दुचाकीवरून ट्रीपल सीट प्रवास करणे, हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर न करणे, सिग्नल नियमाचे पालन न करणे, अशा वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.

कारवाईचा तपशील -

महिना केसेस वसूल दंड प्रलंबित दंड
जानेवारी 18 हजार 795 28 लाख 41 हजार 500 44 लाख 83 हजार 200
फेब्रुवारी 20 हजार 78 19 लाख 7 हजार 700 47लाख 68 हजार 100
मार्च 17 हजार 37 15 लाख 13 हजार 500 48 लाख 63 हजार 300
एप्रिल 5 हजार 23 3 लाख 39 हजार 13 लाख 32 हजार 100
मे 4 हजार 117 1लाख 57 हजार 200 9 लाख 26 हजार 100
जून 17 हजार 240 5 लाख 67 हजार 300 52 लाख 65 हजार 700
जुलै 32 हजार 830 11 लाख 83 हजार 800 1 कोटी 4 लाख 62 हजार 500
एकूण 1 लाख 15 हजार 720 85 लाख 10 हजार 3 कोटी 21लाख 1 हजार

ABOUT THE AUTHOR

...view details