नाशिक- देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र,संचारबंदी लागू असली तरी अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या भाजीपाला, किराणा, दूध खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत असून नागरीकांना सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. यावर नाशिकच्या सपट इंजिनीअरींग कॉलेजमध्ये प्राध्यापक आलेले राहुल शिंपी यांनी एक उपकरण तयार केले आहे.तयार करण्यात आलेले हे डिव्हाइस तुम्हाला वेळोवेळी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्या बाबत सूचना करते.
नाशिकच्या शिक्षकाने बनवले सोशल डिस्टन्सिंगची आठवण करून देणारे "कोरोना कवच" - राहुल शिंपी
देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना वारंवार हात धुण्या बरोबर बाहेर पडल्यावर देखील सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा नियम घालून देण्यात आला आहे. मात्र, काही नागरिकांना विसर पडल्याचे दिसून येत आहे. याची आठवण करुन देणाऱया उपकरणाची निर्मिती प्राध्यापक राहुल शिंपी यांनी केली आहे.
प्रा. राहुल शिंपी यांनी कोरोना कवच नावाने एक उपकरण तयार केले आहे. हे उपकरण तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याबाबत सूचना करते, हात धुण्याबाबत माहिती देते आणि विशेष म्हणजे या उपकरणासमोर असलेल्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान जास्त असल्यावर देखील सिग्नल देत सावधान करते
या उपकरणाची निर्मिती करण्यासाठी शिंपी यांना 800 ते 1000 रुपये खर्च आला आहे. सरकारने किंवा एखाद्या कंपनीने हे उपकरण मोठ्या संख्येने बनवले तर त्याची किंमत देखील कमी होऊन ते सर्वसामान्य नागरिकांना देखील परवडू शकते, असे प्रा. राहुल शिंपी यांनी सांगितले आहे. या कोरोना कवच उपकरणाचे काम नेमके कसे चालते हे जाणून घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतचे प्रतिनिधीनी कपिल भास्कर यांनी केला.