महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Student Return To India : युक्रेनमधून परतलेल्या नाशिकमधील विद्यार्थीनीने सांगितला तिचा थरारक अनुभव - रिद्धी शर्मा युक्रेन मुलाखत

युक्रेनमध्ये नाशिक जिल्ह्यातील 23 विद्यार्थी युक्रेनमध्ये ( Indian Student In Ukraine ) अडकलेले आहेत. यातील फक्त 3 विद्यार्थी परतले ( Nashik Student Return To India From Ukraine ) असून अद्यापही 20 विद्यार्थी युक्रेनमध्ये ( Nashik Student Stuck In Ukraine ) अडकलेले आहेत. दरम्यान, युक्रेनमधून परत आलेल्या रिद्धी शर्मा ( Riddhi Sharma Spoke About Ukraine War ) या विद्यार्थीनीने युक्रेनमधील परिस्थिती सांगितली.

Indian Student In Ukraine
Indian Student In Ukraine

By

Published : Mar 3, 2022, 5:22 PM IST

Updated : Mar 3, 2022, 6:52 PM IST

नाशिक -रशिया-युक्रेनमध्ये युद्ध ( Ukraine Russia War ) सुरू असून यात नाशिक जिल्ह्यातील 23 विद्यार्थी युक्रेनमध्ये ( Indian Student In Ukraine ) अडकलेले आहेत. यातील फक्त 3 विद्यार्थी परतले ( Nashik Student Return To India From Ukraine ) असून अद्यापही 20 विद्यार्थी युक्रेनमध्ये ( Nashik Student Stuck In Ukraine ) अडकलेले आहेत. त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. दरम्यान, नाशिकला राहत असलेली रिद्धी शर्मा युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेली होती. ती परत आली असून तिने युक्रेनमधील परिस्थिती बाबत माहिती दिली.

प्रतिक्रिया

काय म्हणाली रिद्धी शर्मा -

रिद्धी शर्मा एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षी युक्रेनच्या बिकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी शिकत होती. ती आता सुखरूप नाशिकला पोहचली आहे. तिच्या बरोबर बोलताना तिने तिचा अनुभव कथन केला. तिला घरच्यांकडून फोनद्वारे युद्धाची माहिती मिळाली. ती युद्ध होत असलेल्या किवी या शहरापासून 400 किलो मीटरवर होती. युद्ध जन्य परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा शहारामध्ये मोठी धावपळ निर्माण झाली होती. एटीएममध्ये पैसे शिक्षक नव्हते, मॉलमध्ये वस्तू शिल्लक राहिल्या नव्हत्या. सीमेवर 2 ते 3 हजार विद्यार्थी अजून आहे. त्यांना देखील लवकरात आणावे, अशी प्रतिक्रिया तिने दिली. आईनेदेखील सरकारचे आभार मानले आणि बाकीचे मुलांनादेखील लवकरात लवकर आणावे, अशी सरकारकडे विनंती केली.

अजून 20 विद्यार्थी अडकले -

युक्रेन देशात नाशिक जिल्ह्यातील 23 विद्यार्थी शिक्षणासाठी तेथे राहत होते. अशात युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याने भारत सरकारने विद्यार्थ्यांना भारत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांना नाशकात सुखरूप दाखल झाले आहे. मात्र, अजूनही 20 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेले असून त्यांना मायदेशी आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.

हेही वाचा - CM Uddhav Thackeray on BJP : 'माझे 170 मोहरे फोडून दाखवाच'; मुख्यमंत्र्यांचे भाजपाला आव्हान

Last Updated : Mar 3, 2022, 6:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details